iPhone वर FaceTime वापरून एकमेकांबरोबर पाहणे, ऐकणे आणि प्ले करणे ह्यासाठी SharePlay वापरा
FaceTime ॲपमध्ये SharePlay सह, तुमच्या फ्रेंड्स आणि कुटुंबासह FaceTime कॉल सुरू असताना तुम्ही TV शो, चित्रपट आणि संगीत सिंक करून स्ट्रिम करू शकता. कॉलवर इतरांसह रिअल टाइम कनेक्शनचा आनंद घ्या—सिंक केलेले प्लेबॅक आणि शेअर केलेल्या कंट्रोलसह, तुम्ही एकाच वेळी तेच क्षण पाहता आणि ऐकता. स्मार्ट व्हॉल्यूमसह, मीडिया ऑडिओ डायनॅमिक पद्धतीने ॲडजस्ट केलेला असतो, त्यामुळे तुम्ही बघत किंवा ऐकत असताना चॅट चालू ठेवू शकता. FaceTime कॉल दरम्यान तुम्ही Game Center मध्ये सपोर्ट करणारे मल्टिप्लेअर गेम फ्रेंड्सबरोबर देखील खेळू शकता आणि iOS 18.2 किंवा नंतरच्या व्हर्जनमध्ये, सपोर्ट केलेले लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट एकत्र बघू शकता.
टिप : तुम्ही दोन iPhone एकमेकांजवळ होल्ड करून SharePlay त्वरित सुरू करू शकता. (दोन iPhone एकमेकांजवळ होल्ड करून SharePlay सेशन सुरू करा पहा.)
FaceTime कॉल दरम्यान SharePlay इतर ॲपमध्ये देखील वापरले जाऊ शकते. कॉलदरम्यान, SharePlay साठी कोणती ॲप वापरता येतील, हे पाहण्यासाठी
वर टॅप करा, त्यानंतर दिसणाऱ्या ॲपवर स्क्रोल करा.
नोट : Apple TV+ (काही देश आणि प्रदेशांमध्ये फ्रायडे नाइट बेसबॉल समाविष्ट आहे), MSL सीझन पास, Apple TV चॅनल आणि SharePlay ला सपोर्ट करणाऱ्या काही ॲप्ससाठी सदस्यता आवश्यक आहे. चित्रपट, TV शो किंवा लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट एकत्रिपणे पाहण्यासाठी, सदस्यता किंवा खरेदीच्या माध्यमातून किमान सिस्टीम आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या डिव्हाइसवर प्रत्येक सहभागीकडे त्यांच्या स्वतःच्या डिव्हाइसवर कॉण्टेण्टचा ॲक्सेस असणे गरजेचे आहे. SharePlay काही चित्रपट, TV शो किंवा विविध देश किंवा प्रदेशांमधील लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंटच्या शेअरिंगला सपोर्ट करत नाही. FaceTime, FaceTime ची काही वैशिष्ट्ये आणि इतर Apple सेवा कदाचित सर्व देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नसतील.
FaceTime कॉल दरम्यान व्हिडिओ एकत्रितपणे बघणे
तुम्ही तुमचे फ्रेंड्स आणि कुटुंबाबरोबर FaceTime कॉल दरम्यान चित्रपट आणि TV शो सिंकमध्ये पाहू शकता. iOS 18.2 किंवा नंतरच्या व्हर्जनमध्ये, तुम्ही सपोर्ट केलेले लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट देखील बघू शकता.

तुमच्या iPhone वर FaceTime ॲपमध्ये
कॉल सुरू करा.
वर टॅप करा, त्यानंतर ‘एकत्रितपणे ऐका आणि प्ले करा’ च्या खालील ॲपवर टॅप करा (उदाहरणार्थ, Apple TV ॲप
).ह्या व्यतिरिक्त, तुम्ही होम स्क्रीनवर जा, त्यानंतर SharePlay ला सपोर्ट करणारे दुसरे व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप उगडा.
तुम्हाला पहायचा असलेला शो, चित्रपट किंवा लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट सिलेक्ट करा.
‘प्ले करा’ बटणावर टॅप करा, नंतर कॉलवर असलेल्या प्रत्येकासह बघणे सुरू करण्यासाठी SharePlay (दिसत असल्यास) सिलेक्ट करा. (कॉलवरील इतर व्यक्तींना व्हिडिओ पाहण्यासाठी ‘SharePlay जॉइन करा’ वर टॅप करावे लागेल.)
कॉण्टेंटचा ॲक्सेस असणाऱ्या कॉलवरील प्रत्येकासाठी, व्हिडिओ एकाच वेळी प्ले होण्यास सुरुवात होते. ज्यांना ॲक्सेस नाही त्यांना ॲक्सेस मिळवण्यास सांगितले जाते (सदस्यता, व्यवहार किंवा उपलब्ध असल्यास निःशुल्क चाचणीद्वारे).
कॉण्टेंट बघणारी प्रत्येक व्यक्ती प्ले, पॉज, रिवाइंड किंवा फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी प्लेबॅक कंट्रोल वापरू शकते. (क्लोज्ड कॅप्शन आणि व्हॉल्यूमसारखे सेटिंग प्रत्येक व्यक्तीद्वारे स्वतंत्रपणे नियंत्रित केले जातात.)
तुम्ही दुसरे ॲप वापरताना, म्हणजेच पदार्थ ऑर्डर करणे, इमेल तपासणे किंवा चित्रपट किंवा TV शोच्या ध्वनीमध्ये व्यत्यय आणायचा नसेल तेव्हा व्हिडिओसंबंधी संदेश ॲपमध्ये टेक्स्टच्या माध्यमातून चर्चा करणे ह्यासारख्या गोष्टी करताना, व्हिडिओ पाहणे सुरू ठेवण्यासाठी पिक्चर इन पिक्चर वापरू शकता.
FaceTime कॉल दरम्यान सपोर्ट केलेल्या ॲपवरून एकत्रितपणे व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्सना आमंत्रित करणे
किमान सिस्टम आवश्यकता ची पूर्तता करणाऱ्या iPhone वर, तुम्ही ब्राउझ करताना किंवा व्हिडिओ कॉण्टेंट पाहताना Apple TV ॲपवर (किंवा इतर सपोर्ट करणारे व्हिडिओ ॲप) FaceTime कॉल चालू करू शकता आणि SharePlay वापरून इतरांबरोबर सिंकमध्ये आयटम शेअर करू शकता. कॉलवर असलेल्या प्रत्येकाकडे सदस्यता किंवा खरेदीद्वारे त्यांच्या स्वतःच्या डिव्हाइसवरील कॉण्टेंटचा एकाच प्रकारचा ॲक्सेस असणे आवश्यक आहे.
Apple TV ॲपमध्ये (किंवा इतर सपोर्ट करणारे व्हिडिओ ॲप), तुम्हाला शेअर करायचा असलेला शो, चित्रपट किंवा लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट शोधा.
नोट : लाइव्ह स्पोर्ट्स इव्हेंट शेअर करण्यासाठी तुमच्या iPhone वर iOS 18.2 किंवा त्यानंतरचे व्हर्जन असणे आवश्यक आहे.
आयटमचे तपशील पाहण्यासाठी त्यावर टॅप करा,
वर टॅप करा, नंतर 'SharePlay' वर टॅप करा.‘प्रति’ फील्डमध्ये, तुम्हाला शेअर करायचे असलेले संपर्क प्रविष्ट करा, नंतर ‘FaceTime’ वर टॅप करा.
FaceTime कॉल कनेक्ट झाल्यावर, SharePlay वापरणे चालू करण्यासाठी ‘सुरू करा’ किंवा ‘प्ले करा’ वर टॅप करा.
बघणे सुरू करण्यासाठी, प्राप्तकर्ते टॅप उघडा.
नोट : जर कॉण्टेंटसाठी सदस्यतेची आवश्यकता असेल, तर जे लोक सदस्य नाहीत ते बघण्यापूर्वी सदस्यता घेऊ शकतात.
व्हिडिओ प्ले करणे सुरू झाल्यानंतर, तुम्ही तो Apple TV वर स्ट्रीम करू शकता. तुम्ही SharePlay मध्ये जे बघत आहात ते Apple TV वर पाठवणे पहा.
तुम्ही SharePlay मध्ये जे बघत आहात ते Apple TV वर पाठवणे
तुम्ही iPhone वर एकत्र व्हिडिओ पाहणे आधीच चालू केले असल्यास, मोठ्या स्क्रीनवर त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ते Apple TV ला पाठवू शकता.
iPhone वर, पुढीलपैकी एक करा :
स्ट्रीमिंग ॲपमध्ये,
वर टॅप करा, त्यानंतर प्लेबॅक डेस्टिनेशन म्हणून Apple TV निवडा.कंट्रोल सेंटर उघडा,
वर टॅप करा, त्यानंतर प्लेबॅक डेस्टिनेशन म्हणून Apple TV निवडा.
व्हिडिओ Apple TV वर सिंकमध्ये प्ले होतो आणि तुम्ही तुमच्या iPhone वर संभाषण चालू ठेवू शकता.
Apple TV यूझर गाइडमध्ये SharePlay वापरून एकत्रितपणे पहा.
FaceTime कॉल दरम्यान एकत्रितपणे संगीत ऐकणे
FaceTime कॉलवर तुम्ही एकत्र येऊ शकता आणि इतरांसह अल्बम किंवा आवडती प्लेलिस्ट ऐकू शकता. किमान सिस्टम आवश्यकता ची पूर्तता करणाऱ्या डिव्हाइसमधील संगीताचा (उदाहरणार्थ, सदस्यता, व्यवहार किंवा फ्री ट्रायल या माध्यमातून) ॲक्सेस असलेली, कॉलवर असलेली कुणीही व्यक्ती एकत्रितपणे संगीत ऐकणे, ‘पुढे काय आहे’ ते पाहणे, शेअर केलेल्या यादीमध्ये गाणी समाविष्ट करणे आणि इतर बऱ्याच गोष्टी करू शकते.

वर टॅप करा, त्यानंतर ‘एकत्रितपणे ऐका आणि प्ले करा’ च्या खालील संगीत स्ट्रीमिंग ॲपवर टॅप करा (उदाहरणार्थ, Apple TV ॲप
)ह्या व्यतिरिक्त, तुम्ही होम स्क्रीनवर जाऊ शकता, त्यानंतर, SharePlay ला सपोर्ट करणारे संगीत स्ट्रीमिंग ॲप उघडा (उदाहरणार्थ, Music ॲप
).तुम्हाला ऐकायचे असलेले संगीत सिलेक्ट करा, नंतर एकत्रितपणे संगीत ऐकणे सुरू करण्यासाठी प्ले बटणावर टॅप करा. (कॉलवरील इतर व्यक्तींना संगीत ऐकण्यासाठी ‘SharePlay जॉइन करा’ वर टॅप करावे लागेल.)
कॉण्टेंटचा ॲक्सेस असणाऱ्या कॉलवरील प्रत्येकासाठी, संगीत एकाच वेळी प्ले होण्यास सुरुवात होते. ज्यांना ॲक्सेस नाही त्यांना ॲक्सेस मिळवण्यास सांगितले जाते (सदस्यता, व्यवहार किंवा उपलब्ध असल्यास निःशुल्क चाचणीद्वारे).
प्रत्येक व्यक्ती गाण्याच्या वेगळ्या भागामध्ये पॉज, रिवाइंड, फास्ट फॉरवर्ड, स्क्रब करण्यासाठी किंवा पुढच्या ट्रॅकवर जाण्यासाठी संगीत कंट्रोलचा वापर करू शकते. आणि कॉलवर असलेली कोणतीही व्यक्ती शेअर केलेल्या यादीमध्ये गाणी समाविष्ट करू शकते.
FaceTime कॉल दरम्यान सपोर्ट केलेल्या ॲपवरून एकत्रितपणे संगीत ऐकण्यासाठी फ्रेंड्सना आमंत्रित करणे
किमान सिस्टीम आवश्यकता ची पूर्तता करणाऱ्या iPhone वर, तुम्ही संगीत ॲपमध्ये (किंवा सपोर्ट करणारे इतर संगीत ॲप) FaceTime कॉल सुरू करू शकता आणि SharePlay वापरून कॉलवर इतरांबरोबर सिंकमध्ये संगीत शेअर करू शकता. प्रत्येक व्यक्ती गाण्याच्या वेगळ्या भागामध्ये पॉज, रिवाइंड, फास्ट फॉरवर्ड किंवा स्क्रब करण्यासाठी संगीत कंट्रोलचा वापर करू शकते. आणि SharePlay वापरत असलेली कोणतीही व्यक्ती शेअर केलेल्या यादीमध्ये गाणी समाविष्ट करू शकते. तुम्हाला ज्यांच्याबरोबर शेअर करायचे आहे त्यांच्याकडे संगीताचा ॲक्सेस असणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, सदस्यतेद्वारे).
Apple Music ॲप
उघडा (किंवा सपोर्ट करणारे इतर संगीत ॲप), त्यानंतर तुम्हाला शेअर करायचे असलेल्या संगीतावर टॅप करा.पुढीलपैकी कोणतेही एक करा :
संगीतच्या पुढे
वर टॅप करा, नंतर SharePlay वर टॅप करा.वरच्या उजव्या बाजूला
वर टॅप करा,
वर टॅप करा, त्यानंतर SharePlay वर टॅप करा.
‘प्रति’ फील्डमध्ये, तुम्हाला शेअर करायचे असलेले संपर्क प्रविष्ट करा, नंतर ‘FaceTime’ वर टॅप करा.
जेव्हा FaceTime कॉल कनेक्ट होतो, तेव्हा ‘सुरू करा’ वर टॅप करा.
ऐकणे सुरू करण्यासाठी, प्राप्तकर्ते FaceTime कंट्रोलच्या शीर्षस्थानी असलेल्या गाण्याच्या शीर्षकावर टॅप करतात, त्यानंतर ‘उघडा’ वर टॅप करतात. ज्याच्याकडे कॉण्टेंटचा ॲक्सेस आहे अशा कॉलवरील प्रत्येकासाठी संगीत एकाच वेळी प्ले होणे सुरू होते.
नोट : ज्यांच्याकडे तुम्ही शेअर केलेल्या कॉण्टेंटचा ॲक्सेस नाही, त्यांना ॲक्सेस मिळवण्यास सांगितले जाते.
FaceTime कॉल दरम्यान Game Center मध्ये फ्रेंड्सबरोबर गेम खेळणे
FaceTime कॉलवर Game Center मध्ये तुम्ही फ्रेंड्सबरोबर सपोर्ट केलेले मल्टीप्लेअर गेम खेळू शकता. तुम्ही सर्वप्रथम ‘सेटिंग’
मध्ये तुमचे Game Centre प्रोफाइल सेट करा, फ्रेंड्सना समाविष्ट करा, त्यानंतर App Store मध्ये Game Centre साठी सपोर्ट करणारा मल्टीप्लेअर गेम शोधा आणि डाउनलोड करा.
FaceTime कॉलदरम्यान, गेम उघडा, ‘SharePlay चालू करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.
SharePlay मुळे तुम्ही Apple फिटनेस+ चा वापर करून इतरांबरोबर वर्कआउट करू शकता. तुमच्या iPhone, iPad किंवा Apple TV वर Apple Fitness+ सह SharePlay वापरा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
संभाषणादरम्यान ॲप, वेबपृष्ठे आणि बरेच काही दाखवण्यासाठी तुम्ही तुमची स्क्रीन शेअर देखील करू शकता. FaceTime कॉलमध्ये तुमची स्क्रीन शेअर करा पहा.